सुपीकता वाढविण्यासाठी द्रवरूप जिवाणू खतांचा वापर
03 February 07:00

सुपीकता वाढविण्यासाठी द्रवरूप जिवाणू खतांचा वापर


सुपीकता वाढविण्यासाठी द्रवरूप जिवाणू खतांचा वापर

जमिनीची जैविक व भौतिक सुपीकता वाढविण्यासाठी, पिकांच्या शरीरांतर्गत क्रियांचा वेग वाढविण्यासाठी, शेतातील वाया जाणारे सेंद्रिय पदार्थ कुजविण्यासाठी द्रवरूप जिवाणू खतांचा वापर फायदेशीर आहे. याचबरोबरीने काही प्रमाणात रासायनिक खतांची मात्रा कमी करणे शक्य होते.

जमिनीत वापरासाठी द्रवरूप जिवाणू मिश्रण:
- यामध्ये असहजीवी पद्धतीने नत्र स्थिर करणारे, स्फुरद, सिलिकेट, लोह व जस्त विरघळविणारे, पालाश उपलब्ध करून देणारे, गंधक विघटन करणारे, प्रकाशसंश्लेषण करणारे काही यीस्ट व अॅक्टिनोमायसेट्स आदी जिवाणू असतात.
- जमिनीची जैविक व भौतिक सुपीकता वाढते.
- उपयुक्त जिवाणूंची संख्या जोमाने वाढते.
- स्फुरद, पालाश, लोह,जस्त, गंधक, सिलिकॉन अशा अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढते.
- पिकाची निरोगी वाढ होऊन उत्पादनात भरीव वाढ होते.
- असहजीवी जिवाणूंमार्फत नत्र स्थिरीकरणाद्वारे वातावरणातील नत्र पिकास उपलब्ध होतो.
नत्र, स्फुरद व पालाश, गंधक व इतर सूक्ष्म अन्नद्रव्यांची वापर मात्रा कमी करता येते.

- ऋतुजा राजेंद्र मोरे, शास्त्रज्ञ व विभागप्रमुख,
कृषिसुक्ष्मजीवशास्त्र विभाग, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे.टॅग्स