आंबा सल्ला: आंबा मोहोराची काळजी घ्या
02 February 07:00

आंबा सल्ला: आंबा मोहोराची काळजी घ्या


आंबा सल्ला: आंबा मोहोराची काळजी घ्या

- सद्यस्थितीत करपा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. करपा रोगग्रस्त झाडांमध्ये कोवळी पाने, अंकूर तसेच माेहोर यांच्यावर तपकिरे काळसर ठिपके पडतात.
- नियंत्रणासाठी कार्बेन्डाझिम १२ टक्के अधिक मॅंकोझेब ६३ टक्के या संयुक्त बुरशीनाशकाची २ ग्रॅम प्रतिलिटर पाणी याप्रमाणात फवारणी करावी. आवश्यकतेनुसार दुसरी फवारणी पुन्हा १० दिवसांच्या अंतराने करावी.
- भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी विद्राव्य गंधक (८० टक्के) २.५ ग्रॅम प्रतिलिटर पाणी याप्रमाणात फवारणी करावी.
- झाडाच्या वाढत्या शेंड्यावर तसेच मोहोरावर शेंडा पोखरणारी अळी या किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. प्रादुर्भाव झाल्यास शेंडे वाळून जातात तसेच मोहोर गळून पडतो. - नियंत्रणासाठी क्लोरपायरीफॉस १.५ मि.लि. किंवा क्विनॉलफॉस १.५ मि. लि. प्रतिलिटर पाणी याप्रमाणात फवारणी करावी.
- टीप : प्रखर उन्हात गंधकाची फवारणी करू नये.

- डॉ. विजय अमृतसागर, डॉ. व्यंकटेश आकाशे,
कोरडवाहू फळपीक संशोधन केंद्र सोलापूर.टॅग्स