भाजीपाला सल्ला: भाजीपाला पिकांची काळजी घ्या
01 February 07:00

भाजीपाला सल्ला: भाजीपाला पिकांची काळजी घ्या


भाजीपाला सल्ला: भाजीपाला पिकांची काळजी घ्या

• जानेवारी महिन्यात लागवड केलेली चवळी, गवार, भेंडी हि पिके काढणीस तयार असतील. या पिकांची तोडणी दर तीन दिवसांनी करावी. तोडणी नेहमी कमी उष्णतामानाच्या वेळेस म्हणजे सकाळी किंवा संध्याकाळी करावी. नंतर त्यांची प्रतवारी करुन त्यांची ओलसर केलेल्या पोत्यामधुनच अथवा टोपल्यामध्ये करावी. टोपल्यांना ओलसर पोत्यांनी बंद करावे. भाजीपाल्यावर पाणी टाकू नये. नंतर पॅकींग केलेली भाजीपिके बाजारपेठेत विक्रीसाठी पाठवावीत.
• वेलवर्गीय भाजीपाला पिके तसेच चवळी, गवार, भेंडी हया पिकांना पाण्याचा ताण बसणार नाही याची काळजी घ्यावी. शक्यतो वरील सर्व भाजीपाला पिके ठिबंक सिंचनाचा उपयोग करूनच घ्यावी.

-डॉ. एस.एम. घावडे,
मिरची व भाजीपाला संशोधन विभाग, डॉ. पं. दे. कृ. वि. अकोलाटॅग्स

संबंधित बातम्या