ऊस सल्ला: सुरु उसाचे नियोजन
31 January 07:00

ऊस सल्ला: सुरु उसाचे नियोजन


ऊस सल्ला: सुरु उसाचे नियोजन

• ऊस लागणीनंतर ४-५ दिवसांनी वाफशावर हेक्टरी ५ किलो अॅट्राझीन प्रती हेक्टरी १००० लिटर पाण्यात विरघळून किंवा सेंकॉर (मेट्रीब्युझीन) १५०० ग्रॅम १००० लिटर पाण्यात मिसळून जमिनीवर फवारणी करावी. फवारणी करताना फवारलेली जमीन तुडवू नये.
• खोड किडीच्या नियंत्रणासाठी उसाच्या शेतात प्रती हेक्टरी ५ कामगंध सापळे (इ.एस.बी. ल्युर) शेतात लावावे. आवश्यकता असल्यास क्लोरअँट्रानीलीप्रोल ०.४ % दाणेदार हे कीटकनाशक १८.७५ किलो अथवा फिप्रोनील ०.३ टक्के दाणेदार हे कीटकनाशक २५ ते ३० किलो प्रती हेक्टर या प्रमाणात वापरावे.
• भविष्यात पाण्याचा ताण पडण्याची शक्यता असल्यास म्युरेट ऑफ पोटॅशची मात्रा शिफारशीत मात्रेपेक्षा २५ % ने वाढवून द्यावी.

-डॉ. प्रमोद चौधरी, डॉ. मृणाल अजोतीकर,
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव.टॅग्स

संबंधित बातम्या