द्राक्ष सल्ला: बुरशीनाशकांचा वापर करताना काळजी घ्या
29 January 07:00

द्राक्ष सल्ला: बुरशीनाशकांचा वापर करताना काळजी घ्या


द्राक्ष सल्ला: बुरशीनाशकांचा वापर करताना काळजी घ्या

ढगाळ वातावरण, हलका पाऊस, त्यामुळे वाढणारी आर्द्रता या सर्व गोष्टी भुरीच्या प्रादुर्भावाचे संकेत देतात. सध्याच्या परिस्थितीमध्ये भुरीच्या नियंत्रणासाठी आंतरप्रवाही बुरशीनाशके वापरण्याची वेळ निघून गेलेली आहे. बऱ्याच ठिकाणी आंतरप्रवाही बुरशीनाशके विशेषतः ट्रायअॅझोल जातीतील किंवा टॅब्युल्युरीन जातीतील बुरशीनाशके कमी जास्त प्रमाणामध्ये प्रतिकारशक्ती तयार झालेली असल्यामुळे भुरीचे अपेक्षित नियंत्रण होऊ शकत नाहीत. त्यामुळे त्यांच्या वापरावर अवलंबून राहणे भुरीच्या नियंत्रणासाठी धोक्याचे आहे.

छाटणीनंतर सत्तर दिवसांच्या पुढे असलेल्या बागेमध्ये भुरीसाठी शिफारशीत कोणतेही आंतरप्रवाही बुरशीनाशक वापरल्यास त्याचे उर्वरित अंश विश्लेषणामध्ये निश्चित दिसतील. फक्त मायक्लोब्युटॅनिल व मेट्राफेनॉन या बुरशीनाशकांचा वापर केल्यास या दोन्हीही बुरशीनाशकांची एमआरएल ही तुलनेने जास्त असल्यामुळे उर्वरीत अंश एमआरएलपेक्षा कदाचित कमी राहू शकतील. या सर्वांचा विचार करता ज्या बागा सत्तर दिवसांच्या पुढे असतील, त्यांनी आंतरप्रवाही बुरशीनाशकांचा वापर शक्यतो टाळावा. त्या ऐवजी भुरीच्या नियंत्रणासाठी सल्फर (८० डब्ल्यूजी) ६०० ते ८०० ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात चांगल्या फवारणीयंत्राद्वारे वापरणे जास्त फायदेशीर ठरू शकेल.

राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, पुणे.टॅग्स

संबंधित बातम्या