लिंबूवर्गीय पिक सल्ला: आंबीया बहारातील फळांचे नियोजन
27 January 07:00

लिंबूवर्गीय पिक सल्ला: आंबीया बहारातील फळांचे नियोजन


लिंबूवर्गीय पिक सल्ला: आंबीया बहारातील फळांचे नियोजन

- संत्रा, मोसंबी, लिंबू झाडे आंबिया बहारातील फुलांची पाकळी गळाल्यानंतर ०.१ % कार्बेन्डाझीमची फवारणी करावी.
- फळे वाटण्याएवढी झालेलीं असल्यास फळगळ कमी करण्याकरिता एनएए १० पीपीएम (१ ग्रॅम) + युरिया १ % (१ किलो) + कार्बेन्डाझीम ०.१ % (१०० ग्रॅम) + १०० लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.
- आंबिया बहारातील फळे वाटाण्याएवढी झाल्यावर कॅल्शीयम क्लोराईड ०.२ % द्रावणाची फवारणी करावी. सर्व समावेशक सूक्ष्म अन्नद्रव्याची चिलेटेड स्वरूपातील ०.१ % (१०० ग्रॅम + १०० लिटर पाणी) फवारणी करावी.
- जमिनिद्वारे झिंक सल्फेट २५० ग्रॅम + फेरस सल्फेट २०० ग्रॅम + मॅग्नेशीयम सल्फेट २०० ग्रॅम + बोरॅक्स १०० ग्रॅम प्रती वर्ष / झाड द्यावे.
- झाडाचे पाणी तोडल्यानंतरची (पहिली मात्रा डिसेंबर महिन्यात पाणी तोडताना दिलेली असल्यास) नत्र: स्फुरद: पालाशची दुसरी मात्रा ३६०: १६०: ४० ग्रॅम अनुक्रमे द्यावी.
- शेणखताद्वारे अॅसेटोबॅक्टर १०० ग्रॅम + पीएसबी १०० ग्रॅम + ट्रायकोडर्मा १०० ग्रॅम + व्हॅम ५०० ग्रॅम प्रती झाड (फळावरील झाडे) नियोजन केल्यास २५ % रासायनिक खताची मात्रा वाचविता येईल.

-डॉ. दिनेश पैठणकर, डॉ. योगेश इंगळे,
अखिल भारतीय समन्वयित संशोधन प्रकल्प, फळे (डॉ. पं. दे. कृ. वि. अकोला)टॅग्स

संबंधित बातम्या