द्राक्ष सल्ला: क्रॅकिंग टाळण्यासाठी या उपाययोजना करा
26 January 07:00

द्राक्ष सल्ला: क्रॅकिंग टाळण्यासाठी या उपाययोजना करा


द्राक्ष सल्ला: क्रॅकिंग टाळण्यासाठी या उपाययोजना करा

पावसानंतर मुळाच्या कक्षेमधील ओलावा वाढल्यास मुळे जास्त प्रमाणात प्रमाणात पाणी ओढून घेतात. हे पाणी वातावरणातील आर्द्रता जास्त असल्यामुळे पानातून बाष्पोत्सर्जनामुळे जात नाही. जास्त साखर असलेल्या मण्याकडे वळते. त्यामुळे मण्यात जास्त पाणी होऊन क्रॅकिंगची शक्यता वाढते. या दृष्टिकोनातून खालील गोष्टी महत्त्वाच्या आहेत.

अ) पांढऱ्या मुळ्या कार्यरत असलेल्या बोदावरील भागामध्ये प्लॅस्टिक आच्छादन करून घ्यावे. या आच्छादनामुळे मुळाच्या कक्षेमध्ये जास्त पाणी जाणार नाही. दोन ओळींच्या मधील भागामध्ये एखादा चर अशा प्रकारे काढून घ्यावा, जेणेकरून पावसाचे पाणी बागेतून लवकर बाहेर निघून जाईल.

ब) फळांवरती ऑरगॅनिक पॉलिमर फवारल्यास मण्यावर सूक्ष्म आवरण तयार होते. या आवरणामुळे मण्याच्या सालीमध्ये क्रॅकिंग विरुद्ध जास्त प्रतिकारशक्ती तयार होऊ शकते. अशा पदार्थांची फवारणी घेतल्यास पावसाच्या दिवसामध्ये क्रॅकिंग निश्चित कमी होऊ शकेल.

क) कॅल्शिअम हा घटक दोन पेशींना एकत्र बांधून घेणाऱ्या मध्यम प्रतलामध्ये (मिडल लॅमेला) असतो. कॅल्शिअम पुरेसे असल्यास मिडल लॅमेला सशक्त बनतो. त्यामुळे फळांची सालीची लवचिकता वाढते. व क्रॅकिंगची शक्यता कमी होते. म्हणून कॅल्शिअम उपलब्ध आवश्यकतेनुसार आहे, हे निश्चित करण्यासाठी कॅल्शिअम सल्फेट, कॅल्शिअम क्लोराईड यांची (५०० ते १००० पीपीएम प्रमाणात) मण्यावर फवारणी घेतल्यास फायदा होईल. सर्वसाधारणपणे अशा फवारण्या छाटणीनंतरच्या ७५ ते ८० दिवसांच्या आधी केल्यास चांगले परीणाम मिळतात. कॅल्शिअम क्लोराईड व कॅल्शिअम सल्फेट घडाच्या देठावरती उशिरा येणारी भुरी बऱ्याच प्रमाणात कमी करू शकते.

राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, पुणे.टॅग्स

संबंधित बातम्या