द्राक्ष सल्ला: क्रॅकिंग होण्याची कारणे
25 January 07:00

द्राक्ष सल्ला: क्रॅकिंग होण्याची कारणे


द्राक्ष सल्ला: क्रॅकिंग होण्याची कारणे

वातावरणामधील आर्द्रता वाढलेली असल्यामुळे वेलीमधून होणारे बाष्पीभवन कमी होते. त्यामुळे झाडाला लागणारी पाण्याची गरजसुद्धा कमी होते. पॅन इव्हपोरीमीटरद्वारे बाष्पीभवनाच्या वेग निश्चित जाणून घ्यावा. त्यानुसार सिंचनासाठीचे पाणी कमी करून द्यावे. वेगवेगळ्या वाढीच्या अवस्थेमध्ये प्रति मि.लि. बाष्पोत्सर्जनासाठी किती पाणी द्यावे लागते, याची माहिती घ्यावी. त्याचा उपयोग करणे अतिशय आवश्यक आहे. वाढती साखर असलेल्या मण्यामध्ये पावसाच्या दिवसामध्ये सिंचनाद्वारे पाणी योग्य प्रमाणात ठेवल्यास वेलीवर होणारी क्रॅकिंग कमी होऊ शकेल.

तयार झालेल्या मण्यामध्ये पावसामुळे किंवा जमिनीतून दिलेल्या जास्त पाण्यामुळे जास्त पाणी मण्यात येते. ते पाणी सामावून घेण्याची शक्ती मण्याच्या सालीमध्ये नसेल, तर मणी फुटतात किंवा क्रॅक होतात. याचा अर्थ असा, की ज्या ज्या प्रकारे मण्याच्या सालीची शक्ती वाढविता येईल, त्या घटकांचा वापर पावसाच्या दिवसांमध्ये करणे क्रॅकिंग कमी करण्यासाठी उपयोगाचे आहे.

बऱ्याच शेतकऱ्यांनी बागेवर प्लॅस्टिक लावण्यासाठी नियोजन केले होते. मागील काही वर्षांमध्ये पावसासारखे वातावरण न आल्यामुळे जवळ जवळ सर्व शेतकऱ्यांनी प्लॅस्टिक काढून ठेवलेले आहे. ज्यांच्याकडे हे प्लॅस्टिक लावण्याची व्यवस्था आहे, अशा सर्व शेतकऱ्यामध्ये बागेवर प्लॅस्टिक लावण्याचे प्रयत्न केल्यास निश्चित फायदेशीर ठरू शकेल. विशेषतः २२ -२३ तारखेनंतर पावसाची शक्यता वाढल्यास प्लॅस्टिक खाली असलेल्या काढणीस तयार होत असलेल्या बागांचे संरक्षण सोपे होऊ शकेल.

राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, पुणे.टॅग्स

संबंधित बातम्या