हळद सल्ला: हळद काढणीपूर्वी हे करा
24 January 07:00

हळद सल्ला: हळद काढणीपूर्वी हे करा


हळद सल्ला: हळद काढणीपूर्वी हे करा

• हळदीचा पाला कापण्यास गडबड करू नये. जातीपरत्वे त्या त्या जातींचा कालावधी पूर्ण झाल्यावर हलक्या जमिनीत पंधरा दिवस अगोदर तर भारी जमिनीत एक महिना अगोदर पाणी बंद करावे. त्यामुळे पाला वळण्यास आणि कंद फुगण्यास मदत होते.
• हलक्या जमिनीमध्ये ८० ते ९० % पाने वाळतात. तर भारी जमिनीमध्ये ६० ते ७० % पाने वाळतात.
• पिकाचा कालावधी पूर्ण होताच पाला जमिनीलगत धारदार खुरप्याने कापून घ्यावा. तो ४ ते ५ दिवस शेतातच वाळल्यानंतर गोळा करून ठेवावा त्याचा उपयोग हळद शिजवण्यासाठी इंधन म्हणून करता येतो तसेच या पाल्याचे सेंद्रिय खत तयार करता येते.
• पाला कापल्यानंतर ८ ते १० दिवसांनी जमीन भेगाळल्यानंतर सरी वरंब्यावर लागवड केली असल्यास कुदळीच्या सहाय्याने हळदीची काढणी करावी. जमीन जास्त सुकली असल्यास हलके पाणी देऊन काढणी करावी.

डॉ. जितेंद्र कदम,
काढणी पश्चात व्यवस्थापन पदव्युत्तर संस्था, रोहा.टॅग्स