केळी सल्ला: मृग बागेतील केळफुल कापणीनंतर हे करा
23 January 07:00

केळी सल्ला: मृग बागेतील केळफुल कापणीनंतर हे करा


केळी सल्ला: मृग बागेतील केळफुल कापणीनंतर हे करा

• मृग बाग केळीमध्ये निसवलेल्या घडातील पूर्ण फण्या उमलल्यानंतर त्याचे केळ फुल कापावे व बागेबाहेर नेऊन नष्ट करावे.
• खोडाच्या भोवती लोंबकळणारी पाने कापू नये, त्यांच्यापासून खोडाचे उन्हापासून संरक्षण होते.
• घडावर ०.५ टक्के पोटॅशियम डायहायड्रोजन फॉस्फेट (५० ग्रॅम) अधिक एक टक्का युरियाची (१०० ग्रॅम) प्रती १० लिटर पाण्यात फवारणी करावी. किंवा
• केळफुल कापल्यानंतर एकदा व ३० दिवसांनी दुसऱ्यांदा सल्फेट ऑफ पोटॅशची २ टक्के (२०० ग्रॅम) प्रती १० लिटर पाण्यात फवारणी करावी.

डॉ. विक्रांत भालेराव,
सहाय्यक प्राध्यापक, कृषि महाविद्यालय, धुळेटॅग्स

संबंधित बातम्या