द्राक्ष सल्ला: डाऊनी भुरी नियंत्रणाकडे लक्ष द्या
21 January 07:00

द्राक्ष सल्ला: डाऊनी भुरी नियंत्रणाकडे लक्ष द्या


द्राक्ष सल्ला: डाऊनी भुरी नियंत्रणाकडे लक्ष द्या

• जुन्या द्राक्ष बागेत यावेळी घडाचा विकास होत असताना दिसून येईल. वेळेवर फळछाटणी केलेल्या बागेत यावेळी मण्यात पाणी उतरण्याची अवस्था दिसून येईल. यावेळी बागेत जास्त पाणी दिल्यास यापूर्वी डाऊनी मिल्ड्युचा प्रादुर्भाव झाला असल्यास यावेळीसुद्धा मण्याच्या दांड्यावर काळे डाग दिसून घड लूज पडताना दिसून येईल. तेंव्हा या परिस्थितीमध्ये पाण्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे असेल. याचसोबत कॅनॉपी मोकळी राहील याची काळजी घ्यावी.

• भुरी आणि मिलीबगचा प्रादुर्भावसुद्धा यावेळी दिसून येईल. याकरिता यावेळी बागेत घडाच्या विकासात आवश्यक असलेले पाणी जास्त प्रमाणात दिले जाते. त्यामुळे. तापमान, आर्द्रता व जुनी कॅनॉपी या गोष्टींचा ताळमेळ बसल्यामुळे भुरी रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होतो यावर नियंत्रण म्हणून यावेळी जैविक नियंत्रणाचा वपर महत्वाचा असेल.

-डॉ. आर. जी. सोमकुंवर,
प्रमुख शास्त्रज्ञ, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, पुणे.टॅग्स

संबंधित बातम्या