ऊस सल्ला: अशी करा सुरु उसाची लागण
20 January 07:00

ऊस सल्ला: अशी करा सुरु उसाची लागण


ऊस सल्ला: अशी करा सुरु उसाची लागण

• बेणे मळ्यातील बेणेच ऊस लागवडीसाठी वापरावे. खोडव्याचा ऊस लागणीसाठी वापरू नये. लागणीपूर्वी बिजप्रक्रीयेसाठी ३०० मिली मॅलॅथीऑन + १०० ग्रॅम बाविस्टीन (कार्बेन्डॅझीम) १०० लिटर पाण्यात मिसळून तयार केलेल्या द्रावणात बेणे १०-१५ मिनिटे बुडवावे व नंतर अॅसेटोबॅक्टर व स्फुरद विरघळविणारे जीवाणू अनुक्रमे १० किलो आणि १.२५ किलो १०० लिटर पाण्याच्या द्रावणात टिपऱ्या ३० मिनिटे बुडवून वापराव्यात यामुळे नत्र खताची बचत होऊन स्फुरद खताची उपलब्धता वाढते.

• सुरु ऊसाच्या लागणीच्या वेळी प्रती हेक्टरी २५ किलो नत्र, ६० किलो स्फुरद व ६० किलो पालाश द्यावे. तसेच सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता असल्यास झिंक सल्फेट २० किलो, फेरस सल्फेट २५ किलो, मँगनीज सल्फेट १० किलो व बोरॅक्स ५ किलो प्रती हेक्टरी शेणखतात मिसळून ४ ते ५ दिवस सावलीत मुरवून रांगोळी पद्धतीने ४ ते ५ सेमी खोलीवर ही सूक्ष्म अन्नद्रव्ये द्यावीत. को ८६०३२ या जातीसाठी २५ टक्के रासायनिक खतांची मात्रा जास्त द्यावी.

-डॉ. प्रमोद चौधरी, डॉ. मृणाल अजोतीकर,
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव.टॅग्स

संबंधित बातम्या