लिंबूवर्गीय पिक सल्ला: हस्त व मृग बहारातील नियोजन
17 January 07:00

लिंबूवर्गीय पिक सल्ला: हस्त व मृग बहारातील नियोजन


लिंबूवर्गीय पिक सल्ला: हस्त व मृग बहारातील नियोजन

१) हस्त बहारातील (ऑक्टोबर नोव्हेंबर मधील फुलोऱ्यापासूनची फळे) संत्रा, मोसंबी, लिंबू यांची वाढ योग्य प्रकारे होण्याकरिता झाडावर जिब्रेलिक अॅसिड १५ पीपीएम किंवा 2-4-D १० पीपीएम संजीवक ०:५२:३४- १ टक्का (१ किलो + १०० लिटर पाणी) फवारणी करावी.
२) मृग बहारातील संत्राला गोडी येण्याकरिता तोडणीचे १० ते १५ दिवस अगोदर पाणी बंद करावे व फळे वाहतुकी दरम्यान टिकून राहण्याकरिता ०.१ % कार्बेन्डाझीमची फवारणी करावी.
३) मृग बहारातील फळे काढणी उरकण्यास झाडावरील सल काढावी. फांदी संपूर्ण वाळलेली असल्यास संपूर्ण काढावी व हिरवी + वाळलेली असल्यास फांदीचा २ सेमी हिरवा भाग ठेऊन वाळलेला भाग काढून टाकावा व झाडावर त्वरित कार्बेन्डाझीम ०.१ % (१ ग्रॅम / लिटर) किंवा ०.६ ते ०.८ % बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी. मोठी फांदी काढलेली असल्यास फांदीच्या कापलेल्या भागावर बोर्डोपेस्ट १० % लावावी.

-डॉ. दिनेश पैठणकर, डॉ. योगेश इंगळे,
अखिल भारतीय समन्वयित संशोधन प्रकल्प, फळे (डॉ. पं. दे. कृ. वि. अकोला)टॅग्स

संबंधित बातम्या