भाजीपाला सल्ला: उन्हाळ्यापूर्वीचे पाण्याचे नियोजन
14 January 07:00

भाजीपाला सल्ला: उन्हाळ्यापूर्वीचे पाण्याचे नियोजन


भाजीपाला सल्ला: उन्हाळ्यापूर्वीचे पाण्याचे नियोजन

• फेब्रुवारी मार्च महिना म्हटल की उन्हाळयास सुरूवात झाली असे समजतात. दिवसाचे तापमान सरासरी ३० ते ३५ डि.सें. व रात्रीचे तापमान २० ते २५ डि.सें. एवढे राहिल्यामुळे भाजीपाला पिकांची शारीरिक आणि उत्पादित वाढ उदा. कळया, फुले व फुलापासुन फळे तयार होण्याची नैसर्गिक क्रिया झपाटयाने होते. वेलवर्गिय भाजीपाल्यात मादी फुलांपासुन फळधारणा लवकर होते व तयार झालेली फळे झपाटयाने वाढतात. भेंडी, गवार, चवळी तसेच टरबूज व खरबुज या पिकांमध्ये सुध्दा वरील प्रक्रिया समान वेगाने पार पडते.

• असे असले तरी उन्हाळी भाजीपाला पिकांत वातावरणातील उष्णता जसजशी वाढते तसतसे जमिनीचे तापमान सुध्दा वाढते. सहाजीकच जमिनीतुन व वनस्पतीमधुन बाहेर पडणा-या पाण्याचा उत्सर्जनाचा वेग सुध्दा वाढतो व म्हणून पाण्याची गरज वाढते. त्याचप्रमाणे खतांची गरज सुध्दा उत्पादनानुसार, जातीनुसार, जमिनीच्या प्रकारानुसार कमी अधिक होते.

-डॉ. एस.एम. घावडे,
मिरची व भाजीपाला संशोधन विभाग, डॉ. पं. दे. कृ. वि. अकोलाटॅग्स

संबंधित बातम्या