द्राक्ष सल्ला: अशी करा नवीन द्राक्ष लागवड
13 January 07:00

द्राक्ष सल्ला: अशी करा नवीन द्राक्ष लागवड


द्राक्ष सल्ला: अशी करा नवीन द्राक्ष लागवड

- फेब्रुवारी महिन्यात तापमानात वाढ होताना दिसेल. याचसोबत आर्द्रतासुद्धा हळू हळू कमी होऊन वेलीची पाण्याची गरजसुद्धा वाढताना दिसेल. द्राक्षबागेत यावेळी वेलीच्या वाढीच्या विविध अवस्थामध्ये काय कार्यवाही करावी याबद्दलची माहिती खालीलप्रमाणे आहे

नवीन द्राक्ष लागवड- यावेळी वातावरणातील किमान तापमान हे १५ ⁰C च्या वर वाढायला लागले असून हे तापमान १५-२० ⁰C पर्यंत असेल. अशा परिस्थितीत वेलीच्या शरीरशास्त्रीय हालचालींचा वेग वाढतो. तेव्हा नवीन द्राक्ष लागवड करावयाची झाल्यास ही वेळ उत्तम आहे. यावेळी दोन फुट खोल व दोन फुट रुंद अशी चारी घ्यावी व त्यामध्ये शेणखत माती टाकून झाकून घ्यावी. खुंटरोपाची लागवड करतेवेळी जमिनीचा प्रकार पाहूनच अंतर ठरवावे. हलक्या जमिनीत ९ X ५ फुट अंतर तर भारी जमिनीत १० X ६ फुट अंतर ठेऊन लागवड करावी. सुरुवातीचे २०-२५ दिवस फक्त खुंटरोपांना पाणी द्यावे. त्यांतर जसजशी नवीन फुट निघायला सुरुवात होईल तसतशी नत्राची पूर्तता करावी.

-डॉ. आर. जी. सोमकुंवर,
प्रमुख शास्त्रज्ञ, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, पुणे.टॅग्स

संबंधित बातम्या