केळी सल्ला: केळीवरील मावा किडीचे नियंत्रण
08 January 07:00

केळी सल्ला: केळीवरील मावा किडीचे नियंत्रण


केळी सल्ला: केळीवरील मावा किडीचे नियंत्रण

ही कीड केळीच्या पर्णगुच्छ रोगाच्या प्रसारात वाहक म्हणून काम करते. मावा ही कीड आकाराने लहान व गडद करड्या रंगाची असते. सुरवातीच्या काळात किडींना पंख नसतात. पण जशी त्यांची वाढ पूर्ण होते तसे त्यांना उडण्यासाठी पंख येतात. थंड हवामान आणि आर्द्रता या किडींच्या वाढीला पोषक असतात. या माव्याची एक आठवड्यात एक पिढी पूर्ण होते. पिले व प्रौढ कोवळ्या पानातील रस शोषून घेतात. त्यामुळे पाने पिवळी पडू लागतात.

नियंत्रण- मावा किडी नियंत्रणासाठी डायमिथोएट ३० ईसी १ मिली प्रति लिटर पाण्यातून फवारावे.

-डॉ. अंकुश चोरमुले, संशोधन सहयोगी,
कृषि कीटकशास्त्र विभाग, महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी.टॅग्स

संबंधित बातम्या