केळी सल्ला: केळीवरील सूत्रकृमींचे नियंत्रण
07 January 07:00

केळी सल्ला: केळीवरील सूत्रकृमींचे नियंत्रण


केळी सल्ला: केळीवरील सूत्रकृमींचे नियंत्रण

या सुत्रकृमीच्या विविध अवस्थेतील अळया तसेच प्रौढ मादी वनस्पतीच्या मुळात शिरून आतील पेशीद्रव्य शोषतात. त्या स्थलांतरीत असल्यामुळे एका जागी स्थिर न राहता मुळाच्या आतील भागात राहून उपजीविका करतात, जखम केलेल्या ठिकाणी बुरशीची वाढ होऊन मुळया कुजतात. झाडांची वाढ खुंटते. पाने पिवळी पडून जास्त प्रादुर्भाव असल्यास झाड कोलमडते.

नियंत्रण- सूत्रकृमी रोगमुक्त बागेतून कंद निवडावेत. कंदप्रक्रीया आवश्य करावी. ताग, झेंडूचे आांतरपिक घ्यावे. प्रती झाड ५०० ते १००० ग्रॅम निंबोळी पेंड द्यावी. कार्बोफ्युरॉन ५० ग्रॅम प्रति झाड लागवडीवेळी व लागवडीनंतर तीन महिन्यांनी द्यावे.

-डॉ. अंकुश चोरमुले, संशोधन सहयोगी,
कृषि कीटकशास्त्र विभाग, महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी.टॅग्स

संबंधित बातम्या