केळी सल्ला: केळीवरील फुलकिड्यांचे नियंत्रण
06 January 07:00

केळी सल्ला: केळीवरील फुलकिड्यांचे नियंत्रण


केळी सल्ला: केळीवरील फुलकिड्यांचे नियंत्रण

या किडींचा प्रादुर्भाव खोड, फुल आणि कोवळया फळांवर आढळून येतो. फुलकिडे केळीच्या सालीत अंडी घालतात. बाल्यावस्था बाहेर आल्यानंतर त्याठिकाणी अन्नरस बाहेर येतो.

पिले व प्रौढ अपरिपक्व अवस्थेत केळीची साल खरवडून त्यातील रस शोषतात. फळांवर तांबूस तपकरी किंवा काळसर चट्टे पडतात. साल खरबरीत होऊन फळांची गुणवत्ता खराब होते त्यामुळे बाजारभाव मिळत नाही.

नियंत्रण- बाग स्वच्छ ठेवावी. संपर्ण फण्या निसवल्यानंतर केळफूल तोडावे. गरजेनुसार व्हर्टिसिलियम लेकॅनी ४ ग्रॅम प्रती लिटर किंवा पाच टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी.

-डॉ. अंकुश चोरमुले, संशोधन सहयोगी,
कृषि कीटकशास्त्र विभाग, महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी.



टॅग्स

संबंधित बातम्या