केळी सल्ला: केळीवरील कंद पोखरणाऱ्या सोंडेकीडीचे नियंत्रण
05 January 07:00

केळी सल्ला: केळीवरील कंद पोखरणाऱ्या सोंडेकीडीचे नियंत्रण


केळी सल्ला: केळीवरील कंद पोखरणाऱ्या सोंडेकीडीचे नियंत्रण

या किडीचे प्रौढ कंदामध्ये एक एक करून अंडी घालतात. अंडी उबवणीचा कालावधी ७
ते १४ दिवसाचा असून अळीअवस्था २ ते ६ आठवड्यांची असते व कोषावस्था १ आठवड्याची असते. या किडीचा प्रादुर्भाव लागवडीनंतर १ ते २ महिन्यांनी होतो. या किडीच्या प्रादुर्भावामुळे सुरवातीच्या काळात दृश्य अशी लक्षणे दिसत नाहीत त्यामुळे या किडीचे सुरुवातीच्या काळात नियंत्रण करणे अवघड जाते. या किडीची अळी व प्रौढ कंद पोखरतात. झाड निस्तेज होऊन पानांचा आकार लहान होतो. कंद पोखरल्याने मुळ्यांचा कंदाशी संपर्क तुटून झाड कोलमडते. जास्त प्रादुर्भाव असल्यास खोडात शिरून घडाचा दांडा पोखरल्यामुळे घड सटकतात.

नियंत्रण-
१. लागवडीसाठी कंदाची निवड निरोगी बागेतून करावी अथवा उती संवर्धित रोपांची लागवड करावी. खोडवा घेणे टाळावे.
२. ३३ ग्रॅम कार्बोफुरॉन ३ सीजी ३३ ग्रॅम/ कंद याप्रमाणे द्यावे.
३. किडीला आकर्षित करण्यासाठी सापळ्यांचा वापर करावा. रात्री केळीच्या खांबाचे एक फूट लांबीचे तुकडे करून केळीच्या झाडालगत ठेवल्यास प्रौढ त्याकडे आकर्षित होतात, ते गोळा करून नष्ट करावेत.

-डॉ. अंकुश चोरमुले, संशोधन सहयोगी,
कृषि कीटकशास्त्र विभाग, महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी.टॅग्स

संबंधित बातम्या