द्राक्ष सल्ला: बागेत रिकट घेताना हे करा
03 January 07:00

द्राक्ष सल्ला: बागेत रिकट घेताना हे करा


द्राक्ष सल्ला: बागेत रिकट घेताना हे करा

रिकट घेण्यापूर्वी बागेत प्रत्येक वेलीस १ घमेला शेणखत व २०० ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट, १० किलो फेरस सल्फेट प्रति एकर याप्रमाणे टाकून त्यावर माती झाकून घ्यावी. यामुळे मुळाचा विकास होण्यास मदत होईल व आवश्यक त्या अन्नद्रव्यांची पुर्तता होईल.

रिकट घेताना बऱ्याचवेळा खाली वर कुठे रिकट घ्यावा याबद्दल विचार येतो. ज्या ठिकाणी एकसारख्या जाडीची काडी बागेत दिसून येते अशा ठिकाणी रिकट घ्यावा. अन्यथा कलम जोडाच्यावर ५ ते ६ डोळे राखून रिकट घेता येईल.

रिकट घेण्यापूर्वी काडीच्या कलमजोडाच्या पुढे ८-१० पाने गाळून घ्यावीत. डोळा फुगला असल्यास नवीन फुटी लवकर व एकसारख्या फुटतात. डोळे फुटण्याकरिता हायड्रोजन सायनामाईडचा वापर महत्त्वाचा असतो. तेव्हा काडीची जाडी व बागेतील तापमान या गोष्टींचा विचार करून मात्रा ठरवावी. साधारणतः ८-१० मिमी जाड काडी व ३०-३२ अंश तापमान असल्यास ४० मिली हायड्रोजन सायनामाईड प्रति लिटर पाणी पुरेसे असेल.

-डॉ. आर. जी. सोमकुंवर,
प्रमुख शास्त्रज्ञ, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, पुणे.टॅग्स

संबंधित बातम्या