कांदा सल्ला: कांदा बीजोत्पादन करताना काळजी घ्या
02 January 07:00

कांदा सल्ला: कांदा बीजोत्पादन करताना काळजी घ्या


कांदा सल्ला: कांदा बीजोत्पादन करताना काळजी घ्या

कांदा बीजोत्पादनाच्या रोपांकरिता
१) लागवडीनंतर ४०-६० दिवसांनी खुरपणी करावी.
२) लागवडीनंतर १५ दिवसांनी प्रोफेनोफॉस १ मि.ली. अधिक मॅन्कोझेब १ ग्रॅम प्रति लिटर यांची फवारणी आवश्यकतेनुसार करावी.
३) पुढील फवारणी १५ दिवसांच्या अंतराने कार्बोसल्फान १ मि.ली. प्रति लिटर अधिक हेक्साकोनॅझोल १ ग्रॅम प्रति लिटर यांची फवारणी आवश्यकतेनुसार करावी.
४) यानंतरसुद्धा फुलकिडे व पानांवरील रोग यांचा बंदोबस्त झाला नाही तर फिप्रोनील १ मि.ली. अधिक प्रोपिकोनाझोल १ ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात फवारणी करावी.
५) लागवडीनंतर नत्र खताचा पहिला हप्ता ३० दिवसांनी ३० किलो प्रति हेक्टर या प्रमाणात द्यावा. दुसरा हप्ता याच प्रमाणात ४५ दिवसांनी द्यावा.
६) बुरशीनाशक किंवा किटकनाशक यांच्या फवारण्या लागवडीच्या ८० दिवसांनंतर करू नये कारण त्यानंतर फुले उमलण्यास सुरुवात होते.
७) फुले उमलल्यानंतर बुरशीनाशक किंवा किटनाशक फवारल्यास मधमाशांना हानी पोहोचते.
८) पाण्याच्या दोन पाळ्यांमधील अंतर हे १० ते १२ दिवस इतके ठेवावे.

-डॉ. शैलेन्द्र गाडगे, डॉ.ए.थंगासामी, डॉ.मेजर सिंह
भाकृअनुप-कांदा व लसूण संशोधन संचालनालय, राजगुरूनगर,पुणे.टॅग्स

संबंधित बातम्या