भाजीपाला सल्ला: अशी करा वांगी, टोमॅटोची लागवड
01 January 07:00

भाजीपाला सल्ला: अशी करा वांगी, टोमॅटोची लागवड


भाजीपाला सल्ला: अशी करा वांगी, टोमॅटोची लागवड

वांगी पिकासाठी अरुणा (डॉ. पंदेकृवि अकोला व्दारा प्रसारित) मांजरी गोटा, पुसा पर्पल क्लस्टर, पुसा पर्पल लाँग, पुसा क्रांती, वैशाली, रुचिरा, प्रगती या सुधारित वाणांची निवड करावी. वांग्याची रोपे ६ ते ८ आठवड्याची झाल्यावर सरी वरंब्यावर ७५ X ६० सेंमी अंतरावर लावावीत. वांगी पिकाला ६० किलो नत्र + ५० किलो स्फुरद + ५० किलो पालाश दयावे. त्यापैकी अर्धे नत्र व संपुर्ण स्फुरद आणि पालाश लागवडीवेळी दयावे. राहिलेले अर्धे नत्र लागवडीनंतर ३० दिवसांनी दयावे. जमिनीत पुरेसा ओलावा नसल्यास लगेच हलके पाणी दयावे.

टोमॅटो पिकांच्या पुसा रूबी, पुसा अर्ली डार्फ, पुसा गौरव, रोमा, पंजाब छुआरा, भाग्यश्री, धनश्री, अरका सौरभ ई. सुधारीत जाती आहेत. टोमॅटोची रोपे ४ ते ६ आठवडयाची किंवा १५ ते २० सेंमी झाल्यावर सरी वरंब्याच्या वाफ्यात ६० X ६० सेंमी अंतरावर स्थलांतरीत करावी.

-डॉ. एस.एम. घावडे,
मिरची व भाजीपाला संशोधन विभाग, डॉ. पं. दे. कृ. वि. अकोलासंबंधित बातम्या