लिंबूवर्गीय पिक सल्ला: पाणी आणि खत नियोजन
31 December 07:00

लिंबूवर्गीय पिक सल्ला: पाणी आणि खत नियोजन


लिंबूवर्गीय पिक सल्ला: पाणी आणि खत नियोजन

१) संत्रा / लिंबू मृग बहाराकरिता ठिबक सिंचनाद्वारे पाणी देतांना दररोज बाष्पोत्सर्जनाच्या ८० टक्के पाणी द्यावे. त्यामुळे दर्जेदार उत्पादनात वाढ होवून ४० टक्क्यांपर्यंत पाण्याची बचत होते.
२) संत्रा, लिंबू, मोसंबी झाडाकरिता (६ वर्ष व अधिक वय) शेणखतासोबत ट्रायकोडर्मा १०० ग्रॅम प्रत्येकी (हरजीनय + व्हीरीडी) + अॅझॅटोबॅक्टर १०० ग्रॅम + पीएसबी १०० ग्रॅम + व्हॅम (मायकोरायझा) ५०० ग्रॅम यांचा वापर करून रायासनिक खतांची मात्रा २५ टक्के कमी करून जमिनीचा पोतसुद्धा सुधारता येईल.
३) हस्त बहारातील लिंबू फळे पोसण्याकरिता ठिबकद्वारे खताचे नियोजन करत असल्यास ९६ ग्रॅम नत्र + ४८ ग्रॅम प्रत्येकी स्फुरद व पालाश ठिबकद्वारे द्यावे.
४) जानेवारी महिन्यात लिंबूवर खैऱ्या रोगाचा उपद्रव्य संभवतो. नियोजनाकरिता कॉपर ऑक्सीक्लोराईड ०.३ टक्के (३० ग्रॅम) + स्ट्रेप्टोसायक्लीन १०० पीपीएम (१ ग्रॅम) + १० लिटर पाण्यातून फवारणी करावी.
५) डिंक्या रोगाचे व्यवस्थापन करावे.

-डॉ. दिनेश पैठणकर, डॉ. योगेश इंगळे,
अखिल भारतीय समन्वयित संशोधन प्रकल्प, फळे (डॉ. पं. दे. कृ. वि. अकोला)टॅग्स

संबंधित बातम्या