द्राक्ष सल्ला: नवीन बागेत रिकट घेण्यापूर्वी...
30 December 07:00

द्राक्ष सल्ला: नवीन बागेत रिकट घेण्यापूर्वी...


द्राक्ष सल्ला: नवीन बागेत रिकट घेण्यापूर्वी...

नुकत्याच कलम केलेल्या बागेत आता रिकट घेण्याचा कालावधी असेल. मागील हंगामात कलम केल्यानंतर सायन व खुंटकाडीची जाडी कमी अधिक असल्यामुळे बाग मागेपुढे फुटते. या फुटी पुन्हा पावसात वेगवेगळ्या किडी व रोगाच्या प्रादुर्भावामुळे किड व रोगग्रस्त झाल्यास दुसऱ्या परिस्थितीमध्ये पाण्याचे ठराविक आयुष्य संपल्यानंतर पाने पिवळी पडून गळून पडतात. अशा परिस्थितीत वेलीची वाढ थांबते. त्याकरिता बागेत वेलीचा नवीन सांगाडा तयार करण्याकरिता रिकट घेणे गरजेचे असते.

रिकट घेतेवेळी बागेतील किमान तापमान १५ अंशच्या पुढे असणे गरजेचे असते. अशावेळी वेलीच्या शरीरशास्त्रीय हालचालीस वेग येतो व त्याचा परिणाम वाढीवर दिसून येतो. ही परिस्थिती सांगली व सोलापूरमध्ये या महिन्यात दिसून येईल. कारण या भागात तापमान जास्त असून आर्द्रतासुद्धा कमी असते. याच तुलनेत नाशिक भागात ही परिस्थिती फेब्रुवारी महिन्यात दिसून येईल. तेव्हा, परिस्थितीचा विचार करून बागेत रिकट घ्यावा.

-डॉ. आर. जी. सोमकुंवर, प्रमुख शास्त्रज्ञ,
राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, पुणे.टॅग्स

संबंधित बातम्या