ऊस सल्ला: खोडवा उसाचे खत नियोजन
29 December 07:00

ऊस सल्ला: खोडवा उसाचे खत नियोजन


ऊस सल्ला: खोडवा उसाचे खत नियोजन

१) पहिले पाणी दिल्यानंतर ३ ते ४ दिवसांनी वापसा आल्यानंतर पहारीच्या सहाय्याने हेक्टरी १५० किलो नत्र (६.५ गोण्या युरिया), ७० किलो स्फुरद (सिंगल सुपर फॉस्फेट ९ गोणी), ७० किलो पालाश (२.५ गोण्या म्युरेट ऑफ पोटॅश) यांचे मिश्रण तसेच झिंक सस्फेट २० किलो, फेरस सल्फेट २५ किलो, मँगेनीज सल्फेट १० किलो आणि बोरॅक्स ५ किलो प्रति हेक्टरी या प्रमाणात चांगल्या कुजलेल्या शेणखतात १०:१ या प्रमाणात मिसळून २ ते ३ दिवस मुरवून एकत्रित करून बुडख्यापासून सरीच्या एका बाजूला १५ ते २० सें.मी. अंतरावर व १५ सें.मी. खोलीवर पहारीने छिद्र घेवून द्यावे, दोन छिद्रातील अंतर ३० सें.मी. ठेवावे.
२) ठिबक सिंचनाची सोय असल्यास १ ते ४ आठवड्यापर्यंत ऊसाच्या वाढीच्या अवस्थेनुसार प्रति हेक्टरी ३० किलो नत्र, ९ किलो स्फुरद व ९ किलो पालाश हि अन्नद्रव्ये ठिबक सिंचन प्रणालीमधून द्यावीत.
३) किडग्रस्त/ तणग्रस्त लागण क्षेत्र असल्यास थोडवा ठेवू नये. तसेच कमीत-कमी हेक्टरी १ लाख ऊसांची संख्या असलेल्या क्षेत्रातच खोडवा ठेवावा.

-डॉ. प्रमोद चौधरी, डॉ. मृणाल अजोतीकर,
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव.टॅग्स

संबंधित बातम्या