ऊस सल्ला: खोडवा घ्यायचाय मग हे करा...
28 December 07:00

ऊस सल्ला: खोडवा घ्यायचाय मग हे करा...


ऊस सल्ला: खोडवा घ्यायचाय मग हे करा...

१) ऊस तोडणीनंतर शेतातील पाचट पेटवू नये. खोडवा ठेवताना पाचटाची कुट्टी करू नये अगर पाचट एकाआड एक सरीत ठेवू नये.
२) ऊस तोडणीनंतर पाचट सलग सरीत दाबून ऊसाचे बुडखे मोकळे करून घ्यावेत.
३) ऊसाचे बुडखे धारदार कोयत्याने जमिनीलगत छाटून घ्यावेत व त्यावर ०.१ टक्के कार्बेन्डॅझिम (बाविस्टीन) ची फवारणी करावी. (१०० लिटर पाण्यात १०० ग्रॅम कार्बेन्डॅझिम)
४) पाचटावर प्रति हेक्टरी ८० किलो युरिया, १०० किलो सिंगल सुपर फॉस्फेट टाकावे. त्यानंतर १० किलो पाचट कुजविणारे जीवाणू शेणखत कंपोस्ट खतामध्ये मिसळून टाकावेत.

-डॉ. प्रमोद चौधरी, डॉ. मृणाल अजोतीकर,
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव.टॅग्स

संबंधित बातम्या