डाळिंब सल्ला: असे करा हस्त बहारातील डाळिंब बागेचे व्यवस्थापन
26 December 07:00

डाळिंब सल्ला: असे करा हस्त बहारातील डाळिंब बागेचे व्यवस्थापन


डाळिंब सल्ला: असे करा हस्त बहारातील डाळिंब बागेचे व्यवस्थापन

हस्त बहारातील बागांचे व्यवस्थापन:
१) छाटलेल्या, रोगट फांद्या, फळे जाळून नष्ट करावीत.
२) बागेला चांगल्या प्रतीचे ६ ते ८ सामू व १ डीसीएमचा वजा १ घातपेक्षा कमी विद्युतधारकता असणारे १७ ते १८ लिटर पाणी प्रति झाड, प्रति दिवस द्यावे.
३) फळे पेरूच्या आकाराची असताना प्रतिझाड २०० ग्रॅम १९:१९:१९ आणि २०० ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश या खतांची मात्रा द्यावी.
४) फळ पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी स्पिनोसॅड ०.२५ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारावे.
५) खोडकिडीच्या नियंत्रणासाठी छिद्रांमध्ये इंजेक्शनद्वारे क्लोरोपायरीफॉस १० मि.लि. प्रति लिटर पाण्यात मिसळून हे द्रावण छिद्रामध्ये सोडावे आणि छिद्रे बंद करावीत.
६) ढगाळ वातावरणात ८ ते १० दिवसांच्या अंतराने गरजेनुसार ब्रोमोपॉल (२ ब्रोमो २ नायट्रोप्रोपेन १,३ डायोल) २५ ग्रॅम प्रति १०० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.
७) फळे लिंबू ते पेरू आकाराची असतानाच ०.५ टक्का बोर्डो मिश्रणाची (५०० ग्रॅम अधिक ५०० मोरचूद प्रति १०० लिटर पाणी) फवारणी घ्यावी.
८) बाग फुलोरा अवस्थेत असताना बोर्डो मिश्रणाची फवारणी टाळावी.
९) बागेत जमिनीवर ४ टक्के कॉपर डस्ट ८ किलो किंवा ब्लिचिंग पावडर २०-२५ किलो प्रति एकरी या प्रमाणात धुरळणी करावी किंवा बागेमध्ये १ टक्का बोर्डो मिश्रणाची (१ किलो चुना अधिक १ किलो मोरचूद प्रति १०० लिटर पाणी) जमिनीवर फवारणी करावी.

-डॉ. सचिन हिरे, डाळिंब संशोधन आणि तंत्रज्ञान प्रसार केंद्र, लखमापूर, नाशिकटॅग्स

संबंधित बातम्या