भाजीपाला सल्ला: अशी करा हिरवी मिरची लागवड
25 December 07:00

भाजीपाला सल्ला: अशी करा हिरवी मिरची लागवड


भाजीपाला सल्ला: अशी करा हिरवी मिरची लागवड

जानेवारी महिन्यात मुख्यत्वे करून मिरची, वांगी, टोमॅटो, भेंडी आणि पाले भाज्यामध्ये पालक, मेथी, कोथींबीर ई. पेरणी करता येते. पालेभाज्यांचा कालावधी कमी दिवसांचा असतो.

उन्हाळी हिरव्या मिरची करीता ज्वाला आणि एन.पी-४६-जे मिरची वाणांची शिफारस करण्यात आली आहे. मिरचीचे रोप ४ ते ६ आठवडयाचे किंवा १५ ते २० सेंमीचे झाल्यावर सरी वरंब्याच्या वाफ्यात ६० X ४५ सेंमी अंतरावर लागवड करावी. मिरचीचे शेंडे असणारा भाग १.५ मिली. मोनोक्रोटोफॉस अधिक पाण्यात मिसळणारे गंधक ८० टक्के ३ ग्रॅम अधिक थायरम २ ग्रॅम १० लीटर पाण्यात बुडवुन दयावेत. लागवडीनंतर लगेच हलके पाणी दयावे. रोपे चांगली रूजली म्हणजे वरखते प्रती हेक्टरी १५० किलो नत्र + ५० किलो स्फुरद + ५० किलो पालाश चार समान भागात लागवडीवेळी व त्यानंतर ४, ११ व १३ व्या आठवडयात समान विभागुन रांगोळी पध्दतीने दयावीत.

-डॉ. एस.एम. घावडे,
मिरची व भाजीपाला संशोधन विभाग, डॉ. पं. दे. कृ. वि. अकोलाटॅग्स