लिंबूवर्गीय पिक सल्ला: मृग बहार संत्रा नियोजन
24 December 07:00

लिंबूवर्गीय पिक सल्ला: मृग बहार संत्रा नियोजन


लिंबूवर्गीय पिक सल्ला: मृग बहार संत्रा नियोजन

१) खत/ अन्नद्रव्य व्यवस्थापन सरळ मातीद्वारे करत असल्यास ताण तोडताना शेणखतासह ३६० ग्रॅम नत्र + १६० ग्रॅम स्फुरद व ४० ग्रॅम पालाश द्यावी.
२) संत्रा पिकाकरिता सेंद्रिय अन्नद्रव्य व्यवस्थापनासाठी सहा वर्ष व त्यापेक्षा अधिक वयाच्या झाडांना गांडूळखत ६० किलो + ट्रायकोडर्मा हरजीयानम ४० मि.ली. + अॅझॅडारेक्टीन १ टक्के डब्ल्यु. डब्ल्यु. ४ मि.ली. प्रति लिटर + सुडोमोनास प्ल्युरोसन्स ४० मि.ली. प्रति झाड द्यावे.
३) तसेच फवारणीद्वारे १३:०:४५ + पोटॅशियम नायट्रेट १ टक्का (१०० ग्रॅम + १० लिटर) द्यावे.
४) पाण्याचे नियोजन करताना दुहेरी आळे पद्धतीचा अवलंब करावा किंवा ठिंबक सिंचनाचा वापर करावा जेणेकरून पाण्याचा संपर्क सरळ खोडाशी येणार नाही.

-डॉ. दिनेश पैठणकर, डॉ. योगेश इंगळे,
अखिल भारतीय समन्वयित संशोधन प्रकल्प, फळे (डॉ. पं. दे. कृ. वि. अकोला)टॅग्स

संबंधित बातम्या