द्राक्ष सल्ला: मुळी कार्यकरण्याकडे विशेष लक्ष द्या
23 December 07:00

द्राक्ष सल्ला: मुळी कार्यकरण्याकडे विशेष लक्ष द्या


द्राक्ष सल्ला: मुळी कार्यकरण्याकडे विशेष लक्ष द्या

ज्या बागेमध्ये मन्यात पाणी उतरायला वेळ आहे अशा बागेत स्फुरदची जमिनीतून उपलब्धता करणे गरजेचे असेल. बरेचशे बागायतदार बागेत पाणी उतरतेवेळी संजीवकांची फवारणी करतात. यावेळी फारसा उपयोग होत नाही. मन्याची साल जाड होऊन मन्यात गोडी उशीरा येते. तेव्हा, संजीवकाचा वापर टाकून मुळी कार्यकरण्याकडे विशेष लक्ष द्यावे. यावेळी सुद्धा बोदावर मल्चिंग केल्यास मुळी चांगली कार्य करेल. याकरिता काही प्रमाणात बोद टाचून घ्यावे. थोडीफार हवा बोदामध्ये गेल्यास मुळी कार्य करण्यास त्याचे चांगले परिमाण दिसून येतील.

स्थानिक बाजारपेठेकरिता जर द्राक्ष पाठवायचे असल्यास ही द्राक्षे गोड असने गरजेचे असते. यावेळी मात्र द्राक्षघड मोकळ्या वातावरणात कॅनॉपीच्या बाहेर असावा लागेल. तेव्हाच त्या मन्यात गोडी वाढेल. याकरिता वेलीच्या फुटी तारेवर मोकळ्या राहतील अशाप्रकारे बांधून घ्याव्यात.

-डॉ. आर. जी. सोमकुंवर,
प्रमुख शास्त्रज्ञ, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, पुणे.टॅग्स

संबंधित बातम्या