कांदा सल्ला: रब्बी कांद्याची पुनर्लागण भाग १
19 December 07:00

कांदा सल्ला: रब्बी कांद्याची पुनर्लागण भाग १


कांदा सल्ला: रब्बी कांद्याची पुनर्लागण भाग १

ज्या शेतकऱ्यानी अद्याप रोपांची पुनर्लागण केलेली नाही, त्यांनी ४५-५० दिवसांच्या रोपांची पुनर्लागण करावी.
१) पुनर्लागणीकरिता रोप निवडताना योग्य काळजी घेतली पाहिजे. खूप जास्त वाढ झालेली किंवा अतिशय कोवळी रोपे लावणे टाळावे. रोपे उपटल्यावर त्यांच्या पानांच्या शेंड्याकरील १/३ भाग पुनर्लागवडीपूर्वी कापून टाकावा.
२) बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव कमी करण्याकरिता कार्बेन्डाझिम १ ग्रॅम प्रति लिटर या द्रावणात रोपांची मुळे बुडवून नंतरच पुनर्लागण करावी.
३) दोन ओळींमध्ये १५ सें.मी व दोन रोपांमध्ये १० सें.मी. अंतर ठेवून पुनर्लागण करावी.
४) पुनर्लागणीनंतर ३० दिवसांनी नत्र खताचा पहिला हप्ता ३५ किलो प्रति हेक्टर या प्रमाणात द्यावा.
५) नत्र खताचा दुसरा हप्ता ३५ किलो प्रति हेक्टर या प्रमाणात पुनर्लागणीनंतर ४५ दिवसांनी द्यावा.

-डॉ. शैलेन्द्र गाडगे,डॉ.ए.थंगासामी,डॉ.मेजर सिंह
भाकृअनुप-कांदा व लसूण संशोधन संचालनालय, राजगुरूनगर,पुणे.टॅग्स

संबंधित बातम्या