भाजीपाला सल्ला: अशी तयार करा वांगी व टोमॅटोची रोपे भाग २
18 December 07:00

भाजीपाला सल्ला: अशी तयार करा वांगी व टोमॅटोची रोपे भाग २


भाजीपाला सल्ला: अशी तयार करा वांगी व टोमॅटोची रोपे भाग २

पेरणीपुर्वी २ ते ३ ग्रॅम थायरम प्रती किलो बियाण्यास लावावे . गादीवाफ्यावर ८ ते १० सेंमी अंतरावर वाफ्याच्या रुंदीस संमातर ओळी तयार करून त्यामध्ये दाणेदार फोरेट १० टक्के हेक्टरी हया प्रमाणात टाकावे.

रोपवाटीकेतील माना टाकणा-या रोगापासुन वांगे व टोमॅटोच्या रोपांचे संरक्षण करण्याकरीता, लागवडीपूर्वी बियांण्यास प्रती कीलो ३ ते ४ ग्रॅम कार्बेन्डाझिम हे औषध चोळून दयावे तसेच २५ ते ३० ग्रॅम ट्रायकोडर्मा बुरशी गांडुळ खत कींवा कुजलेल्या शेणखतात प्रती वाफा मिसळुन द्यावे. त्यानंतर हया ओळीमध्ये २ सेंमी खोलीवर बी टाकावे व त्यावर हलकासा मातीचा थर देउन तो झाकावा. त्यानंतर हया वाफ्यात बी उगवेपर्यंत रोज सकाळी संध्याकाळी झारीने पाणी दयावे. अशा प्रकारे वांगी व टोमॅटोची रोपे तयार करावीत.

-डॉ. एस.एम. घावडे,
मिरची व भाजीपाला संशोधन विभाग, डॉ. पं. दे. कृ. वि. अकोला



टॅग्स

संबंधित बातम्या