लिंबूवर्गीय पिक सल्ला: मृग बहारातील संत्रा मोसंबी लिंबू नियोजन
16 December 07:00

लिंबूवर्गीय पिक सल्ला: मृग बहारातील संत्रा मोसंबी लिंबू नियोजन


लिंबूवर्गीय पिक सल्ला: मृग बहारातील संत्रा मोसंबी लिंबू नियोजन

१) मृग बहारातील संत्रा, लिंबू किंवा मोसंबी फळे काढणीला आली असल्यास १५ दिवस अगोदर पाणी बंद करावे.
२) काढणी केलेली फळे अधिक कालावधीसाठी टिकवण्यासाठी काढणीचे पंधरा दिवस अगोदर कार्बेन्डाझिम ०.१ टक्के (१ ग्रॅम कार्बेन्डॉझिम + १० लिटर पाणी) फवारणी करावी.
३) संत्रा, लिंबू किंवा मोसंबी फळे झाडावरच अधिक काळ टिकवायची असल्यास (काढणी पुढे ढकलवयाची असल्यास) जिब्रेलिक आम्ल १५ पीपीएम (१.५ ग्रॅम) + युरिया १ टक्के (१ किलो) १०० लिटर पाण्यात टाकून, फळे हिरवी असताना फवारणी करावी)
४) मृग बहारातील संत्रा किंवा मोसंबी तसेच हस्त बहारातील लिंबू फळांचा आकार वाढविण्याकरिता एन. ए. ए. १० पीपीएम (१.० ग्रॅम) किंवा जिब्रेलिक आम्ल १५ पीपीएम (१.५ ग्रॅम) किंवा २.४, डी. १० पीपीएम (१.० ग्रॅम) + १ टक्का मोनो पोटॅशियम फॉस्फेट, ०:५२:३४- १ किलो + १०० लिटर पाणी मिसळून फवारणी करावी.
५) मृग बहारातील संत्रा, मोसंबी किंवा लिंबू बागेचे आणि थंडीपासून संरक्षणार्थ सायंकाळी ओलीत कारावे. बागेत धूर करावा तसेच मल्चिंग करावे.

-डॉ. दिनेश पैठणकर, डॉ. योगेश इंगळे,
अखिल भारतीय समन्वयित संशोधन प्रकल्प, फळे (डॉ. पं. दे. कृ. वि. अकोला)टॅग्स

संबंधित बातम्या