द्राक्ष सल्ला: जुन्या द्राक्षबागेत असे करा पाणी आणि खत नियोजन
15 December 07:00

द्राक्ष सल्ला: जुन्या द्राक्षबागेत असे करा पाणी आणि खत नियोजन


द्राक्ष सल्ला: जुन्या द्राक्षबागेत असे करा पाणी आणि खत नियोजन

द्राक्षबागेत काही महत्त्वाच्या घडामोडी सुरू असतांना बागेतील वातावरणात बदल घडून येतात. या बदलांमुळे वेलीच्या वाढीवर काही परिणाम दिसून येतात. विपरीत परिणाम टाळण्याकरिता बागेत विशिष्ठ वाढीच्या अवस्थेत काही महत्त्वाच्या कार्यवाही करणे गरजेचे असते.

जुन्या बागेत मन्यामध्ये काही ठिकाणी पाणी उतरायला सुरवात झाली असेल अशा परिस्थितीमध्ये मन्याचा विकास फार होण्याची अपेक्षा नसते. थॉमसन सिडलेस, तास-ए-गणेश, क्लोर - २ ए यासारख्या द्राक्षमन्यामध्ये आता २-३ मिमी आकार वाढू शकतो. यावेळी मन्यामध्ये गोडी महत्त्वाची असेल. असा परिस्थितीमध्ये गोडी वाढण्याकरिता बागेत पाण्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे जमिनीतून ०:०:५०- १ किलो प्रती एकर प्रमाणे २०-२५ दिवस पूर्तता ड्रिपद्वारे करावी. याचसोबत फवारणीच्या माध्यमातून काही प्रमाणात सुद्धा उपलब्धता करता येईल.

-डॉ. आर. जी. सोमकुंवर, प्रमुख शास्त्रज्ञ,
राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, पुणे.टॅग्स

संबंधित बातम्या