हरभऱ्यावरील घाटे अळीचे नियंत्रण
06 December 07:00

हरभऱ्यावरील घाटे अळीचे नियंत्रण


हरभऱ्यावरील घाटे अळीचे नियंत्रण

हरभरा घाटे अळी नियंत्रणासाठी खालील पद्धतीने फवारणी करावी.

हरभरा पेरणीवेळी २०० ग्रॅम ज्वारीचे बियाणे पेरावे. यामुळे मित्र किडी आकर्षित होतात आणि पक्षांसाठी थांबे निर्माण होतात. एक एकर पिकामध्ये १० मचानी लावाव्यात त्यावर पक्षी बसून आळ्या वेचतात.

१ ली फवारणी- घाटे आळीचा उपद्रव दिसून येताच (रोपावस्था)- हेलीओकील ५०० मिली प्रती हेक्टरी
२ री फवारणी- पिक ५० % फुलोऱ्यात असताना- ५ % निंबोळी अर्क/ १- १.५ किलो बी.टी. जीवाणू पावडर प्रती हेक्टरी
३ री फवारणी- घाटे असताना- सायपरमेथ्रीन अथवा स्पार्क १२५० मिली अथवा क्लोरोपायरीफॉस १२५० मिली प्रती हेक्टरी.
रासायनिक कीटकनाशकाची फवारणी शक्यतो आलटून पालटून करावी.

- ए. बी. शास्त्री, डॉ. ला. रा. तांबडे
महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी.टॅग्स

संबंधित बातम्या