आंबा सल्ला: आंब्यावरील तुडतुड्यांचे नियंत्रण करा
05 December 07:00

आंबा सल्ला: आंब्यावरील तुडतुड्यांचे नियंत्रण करा


आंबा सल्ला: आंब्यावरील तुडतुड्यांचे नियंत्रण करा

आंब्यावरील तुडतुडे नियंत्रणासाठी:
तुडतुड्यांची पिल्ले व प्रौढ आंब्याच्या मोहोरावरील, कोवळ्या पालमवीधून तसेच कोवळ्या फळांमधून रस शोषून घेतात. परिणामी मोहोर व लहान फळांची गळ होते. पिल्ले तसेच तुडतुडे शरीरावाटे मधासारखा चिकट पदार्थ बाहेर टाकतात त्यावर काळ्या रंगाच्या बुरशीची वाढ होते व झाड काळे पडते.

नियंत्रणाचे उपाय: बागेत पुरेसा सूर्यप्रकाश राहील अशाप्रकारे फांद्यांची विरळणी करावी. वेळोवेळी बागेचे सर्वेक्षण करून तुडतुडे पिल्लांच्या अवस्थेत असतानाच कीटकनाशकांची फवारणी करावी. पहिली फवारणी डेल्टामेथ्रीन २.८ टक्के प्रवाही ९ मिली प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात मोहोर येण्यापूर्वी करावी. दुसरी फवारणी बोंगे फुटताना आणि उर्वरित तीन फवारण्या पुढीलपैकी एका कीटकनाशकाचा वापर प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात करून १५ दिवसाच्या अंतराने कराव्यात. एकाच कीटकनाशकाची पुन्हा फवारणी करू नये.
• ब्युप्रोफेझीन २५ टक्के प्रवाही २० मिली किंवा
• डायमेथोएट ३० टक्के प्रवाही १० मिली किंवा
• इमिडाक्लोप्रीड १७.८ टक्के प्रवाही ३ मिली किंवा
• लॅमडा सायहॅलोथ्रीन ५ टक्के प्रवाही ६ मिली.

-डॉ.अंबरीश सणस, संशोधन सहयोगी,
डॉ. आनंद नरंगलकर विभाग प्रमुख कृषि किटकशास्त्र विभाग,
डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठ दापोली.टॅग्स