गहू सल्ला: गव्हावरील तांबेरा नियंत्रणासाठी
04 December 07:00

गहू सल्ला: गव्हावरील तांबेरा नियंत्रणासाठी


गहू सल्ला: गव्हावरील तांबेरा नियंत्रणासाठी

गव्हावरील तांबेरा रोगाचे व्यवस्थापन
१. रोग प्रतिकारक्षम जातींची पेरणी करावी. फुले समाधान, नेत्रावती, त्र्यंबक, एनआयएडब्ल्यू- ३४, गोदावरी, पंचवटी इत्यादी जाती तांबेरा रोगास प्रतिकारक्षम आहेत.
रोगाची लागण होताच २५ टक्के प्रोपीकोनॅझोल १० मिली प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात घेऊन पंधरा दिवसाच्या अंतराने दोन वेळा फवारणी करावी.
२. रोगाची लागण दिसून येताच दर पंधरा दिवसाच्या अंतराने डायथेन एम- ४५- २० ग्रॅम व कॉपर ऑक्सीकलोराईड २० ग्रॅम प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात घेऊन तीन फवारण्या कराव्यात.
३. गव्हाची पेरणी थंडीला सुरुवात झाल्यावर १५ नोव्हेंबर पर्यंत करावी. उशीरा पेरणीसाठी फुले समाधान किंवा एनआयएडब्ल्यू- ३४ हे तांबेरा प्रतिकारक्षम वाण पेरावेत.
४. संशोधन केंद्राने शिफारस केल्याप्रमाणे पाण्याच्या पाळ्या दयाव्यात. जास्त पाणी दिल्यामुळे आर्द्रतेमुळे रोगाचे प्रमाण वाढते.

-डॉ. भानुदास गमे, डॉ. बबनराव इल्हे, डॉ. सुरेश दोडके
कृषि संशोधन केंद्र निफाड, जि. नाशिकटॅग्स