लिंबूवर्गीय पिक सल्ला: हस्त बहारातील अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि नवीन लागवड
02 December 07:00

लिंबूवर्गीय पिक सल्ला: हस्त बहारातील अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि नवीन लागवड


लिंबूवर्गीय पिक सल्ला: हस्त बहारातील अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि नवीन लागवड

१) हस्त बहारातील फळे वाटाण्याएवढी झाली असल्यास (फुलोऱ्यानंतर १ ते १.५ महिन्याने) राहिलेली नत्राची अर्धी मात्रा (३०० ग्रॅम नत्र/ झाड) १ किलो युरियाद्वारे दयावी. ठिबकद्वारे नियोजन करताना ९६ ग्रॅम नत्र + ८८ ग्रॅम प्रत्येकी स्फुरद व पालाश दयावे.
२) कागदी लिंबूवरील खैऱ्या रोगाच्या संरक्षणार्थ कॉपर ऑक्सीक्लोराईड (३० ग्रॅम) + स्ट्रेप्टोसायक्लीन (१ ग्रॅम) + १० लिटर पाण्यात टाकून फवारणी करावी.
३) झाडाला बोर्डोमलम लावलेली नसल्यास बोर्डोमलम लावावी.
४) संत्रा/ मोंसबी/ लिंबू नवीन लागवड - बरेच ठिकाणी सोयाबीन / मुग / उडीद / ज्वारी ई खरिप हंगामातील पिके काढणी झाल्यावर फळांची लागवड करतात. लागवड करायची असल्यास पिशवितील रोपे निवडावी संत्र्या करिता नागपूर संत्रा, पीडीकेव्ही संत्रा ५. कागदी लिंबू करिता पीडीकेव्ही बहार, पीडीकेव्ही लाईन, साईसरबती, फुले सरबती. लोणच्याच्या लिंबाकरिता पीडीकेव्ही तृप्ती व मौसंबी करिता न्युसेलर, कोटका गोल्ड, फुले मौसंबी इ. जातीची लागवड शक्यतो या महिन्यात करावी.

-डॉ. दिनेश पैठणकर, डॉ. योगेश इंगळे
अखिल भारतीय समन्वयित संशोधन प्रकल्प, फळे (डॉ. पं. दे. कृ. वि. अकोला)टॅग्स

संबंधित बातम्या