ऊस सल्ला: सुरु उसात असे करा खत व्यवस्थापन
01 December 07:00

ऊस सल्ला: सुरु उसात असे करा खत व्यवस्थापन


ऊस सल्ला: सुरु उसात असे करा खत व्यवस्थापन

१. सुरु ऊस लागणीच्या वेळी प्रती हेक्टरी २५ किलो नत्र (५५ किलो युरिया), ६० किलो स्फुरद (३७५ किलो सिंगल सुपर फॉस्फेट) व ६० किलो पालाश (१०० किलो म्युरेट ऑफ पोटॅश) दयावे. तसेच सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता असल्यास रासायनिक खते देण्याच्या वेळेस प्रती हेक्टरी फेरस सल्फेट २५ किलो, झिंक सल्फेट २० किलो, मँगनीज सल्फेट १० किलो आणि बोरॅक्स ५ किलो शेणखतात मिसळून दयावे व खते रांगोळी पद्धतीने ४ ते ५ सेमी खोलीवर दयावीत. को ८६०३२ या जातीसाठी रासायनिक खताची २५ % जास्त मात्रा दयावी.
२. बेणे मळ्यातील बेणेच ऊस लागवडीसाठी वापरावे. खोडव्याचा ऊस लागणीसाठी वापरू नये.
३. ऊस लागणीनंतर ४ ते ५ दिवसांनी वाफसा आल्यावर ४ किलो अॅट्राझिन (अॅट्राटाफ) किंवा मेट्रीब्युझीन (सेंकॉर) १४५० ग्रॅम प्रती हेक्टरी १००० लिटर पाण्यात विरघळून संपूर्ण जमिनीवर हात पंपाने सकाळी / सायंकाळी फवारावे. फवारणी करताना फवारलेली जमीन तुडवू नये.

-डॉ. प्रमोद चौधरी, डॉ. मृणाल अजोतीकर,
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव.टॅग्स

संबंधित बातम्या