द्राक्ष सल्ला : द्राक्षबागेत करा स्लरीचा वापर
30 November 07:00

द्राक्ष सल्ला : द्राक्षबागेत करा स्लरीचा वापर


द्राक्ष सल्ला : द्राक्षबागेत करा स्लरीचा वापर

स्लरीचा वापर करणे: यावेळी बागेत स्लरीचा वापर केल्यास घडाच्या विकासात चांगली मदत होईल. तेव्हा, स्लरीमध्ये स्फुरद व इतर सुक्ष्म अन्नद्रव्याचा वापर करावा. जवळपास १५ ते २० घमेली शेण व १० लिटर गोमुत्र २०० लिटर पाण्याच्या ड्रममध्ये टाकून त्यामध्ये ५ किलो सिंगल सुपर फॉस्फेट व २ किलो मॅग्नेशियम सल्फेट टाकून ७ ते ८ दिवस सडू दयावे. त्यानंतर ८०० लिटर पूर्ण स्लरी तयार करून बागेत प्रत्येक वेलीस एक लिटर प्रमाणे दयावी. पुढील आठवड्यात पुन्हा अशीच स्लरी तयार करून त्यामध्ये सिंगल सुपर फॉस्फेटच्या ऐवजी १२:६१:०- ५ किलो अशाप्रकारे टाकून ७ ते ८ दिवस स्लरी सडू दयावी व त्यानंतर बागेत वापर करावा.

-डॉ. आर. जी. सोमकुंवर,
प्रमुख शास्त्रज्ञ, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, पुणे.टॅग्स

संबंधित बातम्या