कापूस सल्ला: कापूस शेतात स्वच्छतेसाठी खालील बाबींचा अवलंब करावा भाग- २
29 November 07:00

कापूस सल्ला: कापूस शेतात स्वच्छतेसाठी खालील बाबींचा अवलंब करावा भाग- २


कापूस सल्ला: कापूस शेतात स्वच्छतेसाठी खालील बाबींचा अवलंब करावा भाग- २

१. शक्य असल्यास जमिनीची खोल नांगरणी करावी त्यामुळे जमिनीत असलेल्या किडींच्या अवस्था नांगरणीने चिरडून मरतील किंवा वर येवुन उन्हाने मरतील किंवा त्यावर जगणारे पक्षी त्यांना टीपून खातील.
२. कपाशीच्या खोडवा व कपाशीचे पिक हंगामाबाहेर घेण्याचे टाळावे कारण त्यामुळे किंडीना सतत अन्न पुरवठा होत राहील्याने त्यांच्या जीवन चक्रात खंड पडणार नाही त्यामूळे त्यांची संख्या वाढेल व पूढील हंगामातील पिकावर सहज आक्रमण करून पिकांचे लक्षणीय नुकसान होण्याची शक्यता बळावेल.
३. मार्केट स्थळी, जिनिंग फॅक्टरीमध्ये गुलाबी बोंड अळयांच्या व्यवस्थापनाकरीता वापरण्यात येणारे कामगंध सापळे लावल्यास हंगामानंतरचे पतंग नष्ट करण्यास मदत होते.
४. कपाशीचे बियाणे कडक उन्हात पातळ थर करून वाळवावे म्हणजे त्यात गुलाबी बोंड अळीच्या सुप्त अवस्था असल्यास नष्ट होतील.

-डॉ. प्रशांत डब्ल्यु. नेमाडे आणि डॉ. टी. एच. राठोड
कापूस संशोधन विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.टॅग्स

संबंधित बातम्या