लिंबूवर्गीय पिक सल्ला: मृग बहार व्यवस्थापन
27 November 07:00

लिंबूवर्गीय पिक सल्ला: मृग बहार व्यवस्थापन


लिंबूवर्गीय पिक सल्ला: मृग बहार व्यवस्थापन

मृग बहार असताना आंबिया बहार टाळायचा असल्यास तसेच मृगबहारातील फळांचा आकार वाढविण्याकरिता जिब्रेलिक आम्ल १५ पीपीएम (१.५ ग्रॅम) + मोनो पोटॅशियम फॉस्फेट १ टक्के (१ किलो + १०० लीटर पाण्यात टाकून) ची फवारणी करावी.
२) मृग बहारातील संत्रा, मोसंबी किंवा जानेवारीमध्ये तोडण्यास येणाऱ्या बागेचे अतिथंडीपासून संरक्षण करण्याकरिता सायंकाळी ओलीत करावे. बागेत धूर करावा. तसेच मल्चिंग करावे.
३) संत्रा, मोसंबी किंवा लिंबू बहारातील झाडांवर ०.२ टक्के चिलेटेड स्वरुपातील सूक्ष्म अन्नद्रव्य मिश्रण (२०० ग्रॅम /१०० लीटर पाणी) फवारणी करावी.
४) मृग बहारातील लिंबू फळे काढणी करावयाची असल्यास दोन आठवडे अगोदर पाणी बंद करावे (तोडणीचे) त्यामुळे फळाला पिवळा रंग येतो.
५) लिंबू मृग बहारातील फळांची काढणी भाव नसल्याने उशिरा करावयाची असल्यास फळे झाडावर टिकविण्याकरिता जिब्रेलिक आम्ल १५ पीपीएम (१.५ ग्रॅम) + युरिया १ टक्के (१ किलो) + १०० लीटर पाण्यात टाकून फवारणी करावी, तसेच थंडीपासून संरक्षण करण्याकरिता उपाययोजना करावी.
६) संत्रा / लिंबू मृग बहाराकरिता ठिबक सिंचनाद्वारे पाणी देताना दररोज बाष्पोत्सर्जनाच्या ८० टक्के पाणी द्यावे, त्यामुळे दर्जेदार उत्पादनात वाढ होऊन ४० टक्के पर्यंत पाण्याची बचत होते.

-डॉ. दिनेश पैठणकर, डॉ. योगेश इंगळे
अखिल भारतीय समन्वयित संशोधन प्रकल्प, फळे (डॉ. पं. दे. कृ. वि. अकोला)टॅग्स

संबंधित बातम्या