डाळिंबावरील तेलकट डागाच्या नियंत्रणासाठी एकात्मिक रोगनियोजन
25 November 07:00

डाळिंबावरील तेलकट डागाच्या नियंत्रणासाठी एकात्मिक रोगनियोजन


डाळिंबावरील तेलकट डागाच्या नियंत्रणासाठी एकात्मिक रोगनियोजन

• हलक्या व मध्यम जमिनीत डाळिंब लागवड करावी.
• रोगग्रस्त भागांत शक्यतो हस्त बहार घ्यावा .
• लागवडीसाठी रोगविरहित प्रमाणित केलेली रोपे वापरावीत.
• बागेस ठिबक सिंचनाद्वारे पाणी द्यावे.
• बागेत पाणी साठणार नाही याची काळजी घ्यावी.
• प्रत्येक झाडास तीन ते चार खोडे ठेवावीत.
• छाटणीसाठी व इतर अवजारे निर्जंतुक करून वापरावीत.
• रोगग्रस्त पाने, फुले, फळे, फांद्या गोळा करून जाळून टाकाव्यात.
• बागेत जमिनीवर कॉपर डस्ट ४ टक्के (२० किलो प्रति हेक्टर) धुरळणी करावी.
• छाटणीनंतर खोडावर व छाटलेल्या भागावर बॅक्टीरियानाशक द्रावणाचा मुलामा लावावा.
• फळे असणाऱ्या बागेमध्ये अगोदर ब्लू कॉपर २.५ ग्रॅम प्रति ली + स्ट्रेप्टोसायकलींन ७ ग्रॅम ४० ली पाण्यासाठी फवारणी करावी. त्या नंतर ७ दिवसांनी सुडो ३००- ५ मिली + बॅसि ३००- १ ग्रॅम प्रति ली पाणी फवारणी करावी
• छाटणीनंतर लगेचच १ टक्का बोर्डो मिश्रणाची पहिली फवारणी करावी.
• दुसरी फवारणी १० ते १५ दिवसांच्या अंतराने बॅक्टीरियानाशक ५० ग्रॅम + कॅप्टन (०.५ टक्के) या द्रावणाची करावी.
• त्यानंतर १० ते १५ दिवसांच्या अंतराने सूक्ष्म अन्नद्रव्ये ५ मिली व चि. कॅल्शिअम १ ग्रॅम + चि. बोरॉन १ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून करावी.
• बागेतील रोगाचे प्रमाण आणि रोग वाढीस अनुकूल हवामान असल्यास गरजेनुसार वरीलप्रमाणे फवारण्या कराव्यात.

-श्री. राजु गाडेकर, संपर्क- ७७०९४९०७७७ (एम एस सी फळशास्त्र).टॅग्स

संबंधित बातम्या