द्राक्ष सल्ला: द्राक्षबागेत अन्नद्रव्याचा पुरवठा करणे
23 November 07:00

द्राक्ष सल्ला: द्राक्षबागेत अन्नद्रव्याचा पुरवठा करणे


द्राक्ष सल्ला: द्राक्षबागेत अन्नद्रव्याचा पुरवठा करणे

द्राक्षबागेत या महिन्यात घडाचा विकास होण्याची अवस्था सुरू असेल या अवस्थेमध्ये मन्याची वाढ महत्त्वाची आहे. अशा परिस्थितीमध्ये घडाच्या विकासात महत्त्वाच्या काही गोष्टी जपणे महत्त्वाचे असेल.

अन्नद्रव्याचा पुरवठा करणे: यावेळी मन्याचा आकार फक्त ६-८ मिमी असेल. अशावेळी अन्नद्रव्य व पाणी महत्त्वाचे कार्य करते. मन्याचा आकार वाढण्याकरिता यावेळी स्फुरदाची पुर्तता महत्त्वाची असेल. यावेळी ५० दिवसाचा कालावधी झाला असेल अशावेळी मन्याच्या विकासाकरिता स्फुरदाची वेलीस उपलब्धता गरजेची असेल. तेव्हा बागेत हलकी जमीन असल्यास १२:६१:०- १ किलो प्रती एकर प्रती दिवस प्रमाणे किंवा भारी जमीन असल्यास ०:५२:३४- १ किलो प्रती एकर प्रती दिवस प्रमाणे २५ ते ३० दिवस सुरू ठेवावे. यामुळे घडाचा विकास होण्यास मदत होईल. बागेत पाणी वाफसा असेपर्यंत देत रहावे. बोदामध्ये पाणी अशाप्रमाणे दयावे म्हणजे बोदातील मुळी काळी पडणार नाही.

-डॉ. आर. जी. सोमकुंवर,
प्रमुख शास्त्रज्ञ, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, पुणे.टॅग्स

संबंधित बातम्या