ऊस सल्ला: सुरु ऊस लागवड
22 November 07:00

ऊस सल्ला: सुरु ऊस लागवड


ऊस सल्ला: सुरु ऊस लागवड

१. सूरु उस लागणीसाठी पूर्व मशागतीची कामे पूर्ण करून दोन डोळा टीपरीने उसाची लागण १५ डिसेंबर ते १५ फेब्रुवारी या कालावधीत करावी.
२. उसाची लागण सलग पद्धतीने करताना दोन सऱ्यामधील अंतर मध्यम जमिनीत १ मीटर व भारी जमिनीत १.२० मीटर ठेवावे. तसेच जोड ओळ पद्धतीने लागण करावयाची असल्यास मध्यम जमिनीत २.५ ते ५ फुट व भारी जमिनीत ३ ते ६ फुट अंतर ठेवावे.
३. लागणीसाठी को ८६०३२, को ९४०१२, कोसी ६७१, कोएम ०२६५, कोव्हीएसआय ९८०५, कोव्हीएसआय ०३१०२, व्हीएसआय ४३४, आणि को ९२००५ यापैकी एका वाणाची निवड करावी. लागवडीसाठी एक अथवा दोन डोळ्यांच्या टिपऱ्या अथवा प्लास्टिक ट्रे मधील एक डोळा रोपे वापरावीत.
४. लागणीपूर्वी बेणे ३०० मिली मॅलॅथीऑन (किंवा डायमेथोएट ३०% २६५ मिली) आणि १०० ग्रॅम बाविस्टीन १०० लिटर पाण्यात मिसळून त्यामध्ये १० ते १५ मिनिटे बुडवावे व नंतर अॅसेटोबॅक्टर व स्फुरद विरघळविणारे जीवाणू प्रत्येकी प्रती हेक्टरी १० किलो व १.२५० किलो १०० लिटर पाण्यात मिसळून त्यात कांड्या ३० मिनिटे बुडवून लगेच लागण करावी.

-डॉ. प्रमोद चौधरी, डॉ. मृणाल अजोतीकर,
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, मध्यवर्ती ऊस संशोधन पाडेगाव.टॅग्स

संबंधित बातम्या