कांदा सल्ला: रांगडा कांद्याच्या उभ्या पिकाकरिता
20 November 07:00

कांदा सल्ला: रांगडा कांद्याच्या उभ्या पिकाकरिता


कांदा सल्ला: रांगडा कांद्याच्या उभ्या पिकाकरिता

१) फवारणीद्वारे सूक्ष्मद्रव्ये ५ ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात पुनर्लागणीनंतर ४५, ६० आणि ७५ दिवसांनी द्यावी.
२) मॅन्कोझेब २.५ ग्रॅम प्रति लिटर अधिक मिथोमिल ०.८ ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणे पुनर्लागणीनंतर १५ दिवसांनी फवारणी करण्याची शिफारस आहे. यामुळे फुलकिडे व पानांवरील रोग यांचा प्रतिबंध होईल.
३) पहिल्या फवारणीच्या १५ दिवसानंतर कार्बोसल्फान २ मि.ली. प्रति लिटर अधिक ट्रायसायक्लाझोल १ ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात आवश्यकतेनुसार फवारणी करण्याची शिफारस आहे.
४) दुसऱ्या फवारणीच्या १५ दिवसानंतर प्रोफेनोफॉस १ मि.ली. प्रति लिटर अधिक हेक्साकोनाझोल १ ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात आवश्यकतेनुसार फवारणी करण्याची शिफारस आहे.
५) जर वरील फवारणीनंतर सुद्धा फुलकिडे व पानांवरील रोग यांचा पूर्णपणे बंदोबस्त झाला नाही तर फिप्रोनील १ मि.ली. प्रति लिटर अधिक प्रोपिकोनाझोल १ ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात फवारणी तिसऱ्या फवारणीनंतर १५ दिवसांनी करावी.

-डॉ. शैलेन्द्र गाडगे, डॉ.ए.थंगासामी, डॉ.मेजर सिंह
भाकृअनुप-कांदा व लसूण संशोधन संचालनालय, राजगुरूनगर, पुणे.टॅग्स

संबंधित बातम्या