लिंबूवर्गीय पिक सल्ला: हस्त बहारातील व्यवस्थापन
19 November 07:00

लिंबूवर्गीय पिक सल्ला: हस्त बहारातील व्यवस्थापन


लिंबूवर्गीय पिक सल्ला: हस्त बहारातील व्यवस्थापन

लिंबू हस्त बहाराचे व्यवस्थापन केलेले असल्यास व पाण्याचा ताण तोडलेला नसल्यास झाडाला त्वरित ओलीत करावे. ताण तोडतांना पोटॅशियम नायट्रेट २ टक्के फवारणी करावी तसेच नत्र अर्धी मात्रा आणि स्फुरद व पालाश संपूर्ण मात्रा द्यावी. संत्रा फळावरील बुरशीजन्य रोग नियंत्रणाकरिता कार्बेन्डेझीम ०.१ टक्के अथवा कॉपर ऑक्सीक्लोराईड ०.३ टक्के फवारणी करावी.

पावसाळ्यानंतर झाडाला बोर्डो पेस्ट लावलेली नसल्यास बोर्डोपेस्ट १० टक्के ३ फुटापर्यंत खोडाला लावावी. संत्रा/लिंबू/मोसंबी लहान झाडे जी अद्यापी फळावर यावयाची आहे. (५ वर्षाखालील) व १ वर्ष वयाचे) झाडांना १/३ नत्रः स्फुरद व पालाश त्वरित द्यावे.

-डॉ.दिनेश ह.पैठणकर (प्रभारी अधिकारी), डॉ.योगेश इंगळे (कनिष्ठ वनस्पती रोग शास्त्रज्ञ)
अखिल भारतीय समन्वयीत संशोधन प्रकल्प फळे डॉ.पं.दे.कृ.वि.अकोलाटॅग्स

संबंधित बातम्या