गहू सल्ला: रोग नियंत्रण
18 November 07:00

गहू सल्ला: रोग नियंत्रण


गहू सल्ला: रोग नियंत्रण

गहू पेरणीनंतर ३ दिवसात किंवा उगवणीपूर्वी पेंडीमीथीलीन ३०% ईसी ७० मिली प्रती १० लिटर पाण्यात गवतवर्गीय व रुंद पानाच्या तणनियंत्रणासाठी फवारणी करावी.

पेरणीनंतर ३० ते ३५ दिवसांनी तने ३ ते ४ पानावर असताना रुंद पानाच्या तणांसाठी मेटॅसल्फ्यूरॉन मिथाईल २०% एकरी ८ ग्रॅम २०० लिटर पाण्यात फवारणी करावी किंवा २,४-डी सोडीयम ८०% १२ ते २५ मिली प्रती १० लिटर पाण्यात फवारणी करावी.

-डॉ. सुरेश दोडके, डॉ. भरत रासकर
कृषि संशोधन केंद्र निफाड, नाशिक.टॅग्स