भात सल्ला: साठवण
17 November 07:00

भात सल्ला: साठवण


भात सल्ला: साठवण

भात उत्पादन वाढवणे जसे महत्वाचे आहे तसे उत्पादित केलेला भात सुरक्षितस्थळी साठवणे तितकेच महत्वाचे आहे त्यासाठी साध्या व सोप्या उपाययोजना केल्यास साठवणुकीतील किडींचे नियंत्रण सहज शक्य होते.

भाताची साफसफाई केल्यानंतर दोन वेळा उन्हात खाळ्यावर चांगले वाळवावे म्हणजे त्यातील आर्द्रता कमी होते व त्यामुळे साठवणुकीत किडींचा प्रादुर्भाव होत नाही.

दोन दातांमध्ये दाणा ठेवल्यास चावताना दाण्याचा आवाज कट असा होतो, त्यावेळी भाताची साठवण करावी दाण्यातील ओलावा त्यावेळी १० ते १२ टक्के इतका असतो.

भाताच्या पोत्यांना ओलावा लागू नये म्हणून पोती लाकडी फळ्यांवर जमिनीपासून ४ ते ६ इंच उंच व भिंतीपासून दूर अंतरावर ठेवावीत. पत्र्याची कोठी, हवाबंद कोठी यांचाही वापर फायदेशीर ठरतो.

साठवणुकीत उंदीर घुशी यांचा प्रादुर्भाव होत असतो त्यांच्या नियंत्रणासाठी मुशकनाशकांचा वापर करू शकतो.

-डॉ. नामदेव म्हसकर, कृषि संशोधन केंद्र, कर्जत.टॅग्स

संबंधित बातम्या