कापसाला चांगला मोबदला मिळण्यासाठी योग्य प्रकारे साठवण अशी करावी. (भाग-२)
08 November 07:00

कापसाला चांगला मोबदला मिळण्यासाठी योग्य प्रकारे साठवण अशी करावी. (भाग-२)


कापसाला चांगला मोबदला मिळण्यासाठी योग्य प्रकारे साठवण अशी करावी. (भाग-२)

कपाशीवर रसशोषण करणा-या किडींचा प्रादुर्भाव जास्त असल्यास हा चिकट स्त्राव पानांवरून कापसावर पडतो व रूईची प्रत खालावते. परिणामत: बाजारभाव कमी मिळतो तसेच अशा प्रकारच्या रूईला मागणी नसते. त्यामुळे या कापसाची सुध्दा साठवण वेगळी करावी.
कापसाच्या गंजीत केरकचरा किंवा धुळीचे कण, तंबाखू गुटखा इत्यादीचे खाली झालेले पाऊच मिसळणार नाहीत याची काळजी घ्यावी.

कापूस मोकळी हवा असलेल्या पक्क्या गोदामात साठवावा. ओलसर जागेत साठवणूक केल्यास त्या कापसास पिवळसरपणा येतो त्यामूळे रूई आणि धाग्याची प्रत खालावते.

निरनिराळया कापूस वाणांची साठवण वेगवेगळया ठिकाणी करावी जेणेकरून त्याची भेसळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.

-डॉ. प्रशांत डब्ल्यु. नेमाडे आणि डॉ. टी. एच. राठोड.
कापूस संशोधन विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.टॅग्स

संबंधित बातम्या